साप्ताहिक राशी भविष्य ; ३०मे ते ६ जून २०२१

 

१. मेष : तुमच्या विचारांना आज योग्य दिशा मिळेल. बौद्धिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना दिवस विशेष चांगला जाणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मित्रांचे सहकार्य लाभेल. विरोधकांचा व हितशत्रूंचा त्रास कमी होणार आहे. प्रॉपर्टीसंदर्भात मात्र एखादी समस्या उभी राहू शकते.

२. वृषभ : तुम्ही आपल्या मतांबद्दल अधिक ठाम राहणार आहात. तुमच्या व्यक्तीमत्वाचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीमध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल. मान-सन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा मिळेल. अनेक दिवस प्रॉपर्टीची, व्यवसायाच्या जागेची, रखडलेली कामे आगामी काळात नक्कीच पूर्ण करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी सुसंधी मिळेल.

३. मिथुन : आगामी काळात आपल्या जिद्द व चिकाटीमध्ये वाढ होणार आहे. आपला आत्मविश्वास अधिक दृढ होणार आहे. आजपासून तुम्हाला तुमच्या हितशत्रूंची, विरोधकांची तसेच व्यवसायातील सहस्पर्धकांची त्यांच्या कारवायांची काळजी करावयास नको. त्यांचे बेत तुम्ही उधळून लावू शकाल. आज आपण आपल्या आर्थिक कामांना प्राधान्य द्यावे, ती पूर्ण होतील. कौटुंबिक सौ‘य लाभेल.

४. कर्क : पैसे मिळणे या दृष्टीने दिवस चांगलाच आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. संततीचे प्रश्न सोडवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायामध्ये काही अडचणी येऊ शकतात, तसेच संततीसंदर्भात एखादा मनस्ताप संभवतो. आगामी काळात आपले काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. विरोधकांची मात्र काळजी नको.

५. सिंह : जिद्द व मनोबल वाढेल. आत्मविश्वासाने कार्यरत राहल. तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी सुसंधी लाभेल. भाग्यकारक घटना घडेल. आगामी काळात तुमच्या प्रॉपर्टीसंदर्भातील समस्या कमी होणार आहेत. आगामी काळ हा बिल्डर्स, इस्टेट एजंटस् बांधकाम व्यावसायिक यांना विशेष लाभाचा ठरणार आहे. तुमचे वास्तूबद्दलचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे दिसतील.

६. कन्या : आजचा दिवस तसा सामान्यच म्हणावा लागेल. प्रवास आज नकोत. महत्वाची कामे, महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. अकारण एखादा खर्च झाल्याने मानसिक सौख्य नाहीसे होईल. घरात मतभेदाची शक्यता आहे. आगामी काळात तुम्ही अधिक आत्मविश्वासाने वागाल, तुम्ही आपल्या मतांबद्दल अधिक आग्रही राहल, कठोरपणा मात्र टाळावयास हवा.

७. तूळ : आज आपण आपली अडलेली रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नव्या उत्साहाने व नव्या उमेदीने कामाला लागाल. आनंदी व आशावादी रहाल. वैवाहिक जोडीदाराची योग्य ती साथ लाभल्याने सुखावून जाल. व्यवसायात उलाढाल वाढवू शकाल. आगामी काळात आपणाला अकारण होणार्‍या खर्चाला आळा घालावा लागेल.

८. वृश्चिक : आज आपण उतसाहाने व आनंदाने कामे कराल. तुम्ही अधिक आशावादी राहाल. तुम्ही अधिकाधिक कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आगामी काळात प्रकृतीच्या काही समस्या उभ्या राहण्याची शक्यता आहे. हितशत्रूंचा त्रास जाणवेल.

९. धनु : प्रवासाचे योग आज येणार आहेत व ते सुखकर होतील. नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. एखाद्या अवघड कामात मित्रांची मदत होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला हवी असलेली संधी मिळेल. तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडेल. तुम्ही तुमच्या मतांबद्दल आग्रही राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. तुमच्या स्वभावात कडकपणा येईल.

१०. मकर : आजही दिवसभर तुमचा काम करण्याचा मूड असणार नाही. कामे टाळण्याकडे प्रवृत्ती राहील. निरुत्साह जाणवेल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. निरुत्साही वातावरण जाणवेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. इतके दिवस रखडलेले आर्थिक व्यवहार आगामी काळात पूर्ण होणार आहेत.

११. कुंभ : आपले व्यक्तीमत्व अधिक प्रभावी बनेल. आत्मविश्वास, जिद्द चिकाटी वाढेल. कामाची जबाबदारी स्वीकाराला. वैवाहिक जीवनात मात्र आगामी काळात तीव्र मतभेद संभवतात. त्यामुळे संयमाचे धोरण स्वीकारावयास हवे. आज आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आरोयाची तक्रार जाणवेल. खर्च वाढणार आहेत.

१२. मीन : मन प्रसन्न व आनंदी राहील. आरोग्य उत्तम लाभेल. व्यवसायात सुस्थिंती राहील. नोकरीत तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक कार्यात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील तुमचे निर्णय आगामी काळात अचूक ठरणार आहेत. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. संततीच्या संदर्भात मात्र एखादा मानसिक त्रास संभवतो.

You May Also Like