काय सांगताय! मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करायचं? भाजपच्या नेत्यांमधुन चर्चा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. भाजपामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे असंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितीन गडकरी यांनी लसनिर्मितीसाठी दिलेल्या सल्ल्यावर बोलताना ते म्हणाले की, मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना सोयरसूतक नाही.

पटोले म्हणाले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावलायं.

You May Also Like