सायटोमॅजिलो व्हायरस नेमका काय? अन् धोका कुणाला?

मुंबई : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला होता. हा व्हायरसही नवीन प्रकारचा असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे सातव यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या संपर्कात होते. मात्र, यामुळे सामटोमॅजिलो व्हायरस नेमका काय आहे याविषयी माहिती असणं गरजेचे आहे.

सायटोमॅजिलो व्हायरस नेमका काय?
सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेतील ४० वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात तो आढळून येतो. हा विषाणू संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकी द्वारे प्रसारित होतो. या विषाणू संसर्गामुळे चेहर्‍यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणार्‍यांसाठी धोका
ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणार्‍यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलोची लक्षणे कोणती?
सायटोमॅजिलोची प्राथमिक लक्षणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना कमतरता जाणवते. ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्ग झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमजिलो झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर केला जातो.

 

 

You May Also Like