कसल्या अंगार-भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या

परळी | अंगार-भंगार घोषणा कसल्या देता….हे तुमचे संस्कार आहेत का? अशा शब्दांत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना सुनावले. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी हा प्रकार घडला.

 

जनआशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरून झाला. मात्र भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी दिलेल्या काही घोषणांवरुन पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या.

You May Also Like