आम्ही रेमडेसिवीर काय पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का?; चंद्रकांत पाटील

पुणे: देशासह राज्यात सध्या करोना स्थिती गंभीर आहे. दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजन तसेच रेमिडीसीवर ची कमतरता आहे, यावरून सध्या राजकीय वातावरण तापले असून. विरोधी पक्ष भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलेच युद्ध सुरु असल्याचे दिसतेय.

दरम्यान, रेमडीसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

आम्ही रेमडेसिवीरचं वाटप केलं तर त्यात काय चुकलं? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवं आहे. लोक वणवण भटकत आहेत. 22 तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही, असंही ते म्हणाले. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा, असं त्यांनी सांगितलं.

तसेच, सरकारची यंत्रणा कुठे आहे? मला आता काही हॉस्पिटलचा फोन आला. अजूनही लस आली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लसीकरणाचा खोटा प्रचार सुरुय, तो त्यांच्या लक्षात आलाय. जसा जसा साठा येईल तसा पुरवठा केला जाईल. पुण्यात 6 लाख लसीकरण झालं, असंही त्यांनी सांगितलं.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

You May Also Like