’वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार?; भाजपने मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

मुंबई : तौक्ते चक्रिवादळाच्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन पाहणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? असा थेट सवाल भाजपने उपस्थित केला आहे. वादळ, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी  करोनाचे संकट आणि मुख्यमंत्री मात्र घरात बसलेत, अशा शब्दात भाजपने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली करतात पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?, असे एकावर एक सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.

अजित पवार यांनी केली पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट देत तौक्ते चक्रिवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीची पूर्ण माहिती घेतली. तसेच बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा देखील त्यांनी आढावा घेतला.

You May Also Like