विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?; दीपाली सय्यद यांचे ट्विट व्हायरल

मुंबई : शिसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या राजकीय गदारोळानंतर राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी बोलताना त्यांनी आपल्याला पदाची लालसा नसल्याचे म्हटले. ‘मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावे, मी लगेचच राजीनामा देतो’, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असताना नुकतेच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही ट्वीट करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

 

“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, अशा स्वरुपाचे ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like