कुंभमेळ्यात कुणामुळे पसरला करोना?

नवी दिल्ली – एकीकडे देशभरात करोनाने थैमान घातले आहे तर दुसरीकडे करोनाच्या या वाढत्या संकटात उत्तराखंडमध्ये कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्यात अनेक संतांना करोनाची लागण झाली आहे. कुंभमेळ्यात 14 एप्रिललाच शाही स्नान झाले आहे. यानंतर कुंभमेळ्यात आतापर्यंत 50 हून अधिक साधूंना करोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांतच जूना निरंजनी आणि आह्वान अखाड्याचे अनेक साधू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत

दरम्यान, यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र, आता कुंभमेळ्यात कोरोना कुणामुळे पसरला, यावरून अखाडेच आमने-सामने आले आहेत. यातच कुंभमेळ्यात कोरोना संन्याशी अखाड्यामुळे पसरला, असा आरोप बैरागी अखाड्याने केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर काही अखाड्यांनी कोरोना समाप्तीचीही घोषणा केली आहे. मात्र, बैरागी अखाड्याचे म्हणणे आहे, की संन्याशी अखाड्यामुळेच कुंभमेळ्यात कोरोना पसरला. बैरागी अखाड्याने तो पसरवला नाही. तसेच, कोणताही एक अथवा दोन अखाडे कुंभ समाप्तीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. बैरागी अखाड्याशिवाय, निर्मोही अखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांनी म्हटले आहे, की कुंभमेळ्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाला अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हे जबाबदार आहेत.

दरम्यान, देशात करोनाने थैमान घातले आहे. रोजच्या रोज दोन लाखहून अधिक रुग्ण आता समोर येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथे लाखोलोक एकत्र आले आहेत. यातच निरंजनी अखाड्याने त्यांच्यावतीने कुंभ संपल्याची घोषणा केली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like