मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र पलक तिवारी इब्राहिम नाही तर दुसऱ्या अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री पलक तिवारी इब्राहिमला नाही तर आर्चीज फेम वेदांग रायनाला डेट करत आहे. पलक तिवारी वेदांग रायनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे ऐकून चाहत्यांना धक्का बसला असेल.
पलक आणि वेदांग एकाच टॅलेंट कंपनीशी संबंधित आहेत. या टॅलेंट कंपनीच्या एका खासगी पार्टीत पलक आणि वेदांगची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांची चांगली मैत्री झाली, त्यानंतर दोघेही प्रायव्हेट पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत, पण मीडियाला याचा सुगावाही लागला नव्हता.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन व्हा…