ना भिजणार, ना फाटणार ; अशी असणार शंभर रूपयांची नोट

नवी दिल्ली : ना भिजणार, ना फाटणार अशी नवीन 100 रुपयांची नोट पुढील काहीच दिवसात सर्वांच्या खिशांमधे दिसण्याची शक्यता आहे. ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात भिजणारही नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100 रुपयांच्या वॉर्निक लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय अशा एक अब्ज नोटा छापणार असल्याची माहिती मिळतेयं.

सध्या चलनामध्ये जांभळ्या रंगाच्या 100 रुपयांच्या नोटा आहेत. आता आरबीआय वॉर्निश लावले्या 100 रुपयांच्या नोटा जारी करणार आहे. या नोटा सुद्धा जांभळ्या रंगाच्या असतील. या नोटांचं मुख्य वैशिष्ट्य असेल ते म्हणजे त्या कुठल्याही प्रकारे खराब होणार नाहीत. अनेकवेळा मोडून चुरगळल्यावरही या नोटा फाटणार किंवा कापणार नाहीत. तसेच वॉर्निश पेंट केलेला असल्याने त्या पाण्यात भिजणार नाहीत. सध्या चलनात असलेल्या नोटा या लवकर खराब होतात.

नोटांना टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागचा हेतू आहे. मात्र सध्यातरी केवळ प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर हळूहळू वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील. रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

या नोटासुद्धा महात्मा गांधी सिरीजमधीलच असतील. त्यांची डिझाईन 100 रुपयांच्या नव्या नोटेप्रमाणेच असणार आहे. वॉर्निश लावलेल्या नव्या नोटा सध्याच्या नोटांपेक्षा दुप्पट टिकाऊ असतील. 100 रुपयांच्या नोटेचा सरासरी कालावधी अडीच ते तीन वर्षांचा असतो. मात्र या नव्या नोटा सुमारे साडेसात वर्षे टिकतील अशी माहिती सुत्रांकडुन मिळतेय.

You May Also Like