प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार?

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा करोनाचे सावट पसरले आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या अतिशय भयावह आहे. या परिस्थितीत जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक असून तोच एक पर्याय आहे. दरम्यान, राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे तसंच काय उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच तज्ञांसोबतही चर्चा करत आहे.

या पार्श्व भूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. दरम्यान काही राज्यांनी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवरही निर्बंध आणले आहेत. या दरम्यान अनेकांना प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार अशी चिंता सतावत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु असतील असं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली असून घाबरण्याची किंवा अंदाज बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. प्रवासी तिकीट बूक करुन आरामशीर आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी प्रवास करुन शकतात असं रेल्वेने म्हटलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील असं स्पष्ट करताना रेल्वेने नागरिकांनी तिकीट कंफर्म असेल किंवा आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकावर यावं अशी विनंती केली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like