देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार?

एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली ।  करोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचं पाऊल असणार आहे.  लसीसंदर्भात जायडस कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायल लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरनाला  सुरुवात होऊ शकते.

 

 

अनेक देशांमध्ये लहान मुलांच्या लसीला मिळाली मंजुरी 

आतापर्यंत भारतात 42 कोटींहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.  देशात जवळपास 6 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यात आलं आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे. यासाठी जवळपास दरदिवशी 1 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या दरदिवशी 40 ते 50 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. परंतु, आठवड्याच्या शेवटी ही संख्या आणखी घटते. सरकारचा उद्देश आहे की, 2021 च्या शेवटापर्यंत सर्वच 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, देशात लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक देशांमध्ये आपातकालीन मंजुरी देण्यात आली आहे.

 

 

देशी लस ठरणार महत्त्वपूर्ण 

You May Also Like

error: Content is protected !!