राज्यात लॉकडाऊन वाढवणार का? पहा काय म्हणाले मंत्री जयंत पाटील

पुणे : देशासह राज्यात करोनाने धुमाकूळ घातलेला आहे. परिस्थिति सांभाळणे अवाक्या बाहेर गेली आहे. दरम्यान राज्यातील करोना स्थिती नियंत्रणात आनता यावी म्हणून राज्यासरकारणे आधी  5 एप्रिलपासून देशात कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर, 14 एप्रिलपासून या निर्बंधांमध्ये काही बदल करुन आणखी निर्बंध कडक करण्यात आले. त्यानंतर, 22 एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरी प्रवासावरही बंदी घालण्यात आली. तसेच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे, 1 मेपर्यंत ही नवीन नियमावली लागू राहणार आहे. पण, 1 मे नंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार का असा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारयाला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. त्यामुळे, 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकारने 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. पण, त्यापुढेही लॉकडाऊन वाढणार असल्याचं अनेकांचं मत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरणात्मक उत्तर पाटील यांनी दिले.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like