फक्त 12 एपिसोडनंतर ‘हा’ शो बंद होणार?

मुंबई : मिळालेल्या माहितीनुसार ‘खतरों के खिलाड़ी 11’च्या शूटसाठी सेलिब्रिटी स्पर्धक केपटाउनमध्ये पोहोचले. अशातच एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. करोनामुळे ‘खतरों के खिलाड़ी ११’ या शोच्या एकूण कालावधीला ग्रहण लागलंय. २२ जूनपर्यंत या शोमधली संपूर्ण टीम भारतात परतणार होती, असं बोललं जातं होतं. परंतू करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कठोर नियमांमुळे या शोमधील संपूर्ण टीमच्या प्लॅनवर पाणी फिरलंय. या शोमधील संपूर्ण टीमला आता लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामुळे  केपटाउनमध्ये गेलेल्या सर्व टीमची निराशा झाली असून या शोची सर्व टीम येत्या जूनमध्ये भारतात परतणार होती आणि यासाठीचे सर्वांचे तिकीट देखील बुक करण्यात आले होते. करोनाचा वाढता हाहाकार पाहता या शोची शूटिंग लवकरात लवकर संपवून भारतात परतण्याचा निर्णय ‘खतरों के खिलाड़ी 11’ शोच्या मेकर्सनी घेतलाय. म्हणूनच ‘खतरों के खिलाड़ी 11’ हा शो एकूण १२ एपिसोड झाल्यानंतर बंद केला जाणार आहे. केपटाउनमधली शूटिंग पूर्ण करून सगळी टीम येत्या महिन्याभरात पुन्हा भारतात येणार आहे.

 

You May Also Like