सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चौप्रानं घडवला इतिहास!

१२१ वर्षांच्या प्रतिक्षेला मिळाला पूर्णविराम 

 

 

नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८, तिसऱ्या प्रयत्नात ७६.९७, चौथा प्रयत्न फाऊल झाला.

 

 

ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

 

You May Also Like