राज्यतही बदलाचे वारे? अस्लम शेख, के.सी.पाडवींना डच्चू ?

मुंबई । केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर राज्यातही फेरबदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. या नव्या फेरबदलात काँग्रेसकडून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळतेय. 

या अगोदर शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची एक एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ही जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

 

पक्ष संघटन वाढवण्यावर जोर

नवे फेरबदल करताना तिन्ही पक्षांकडून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षाला उभारी देणाऱ्या आमदाराला मंत्रिपद दिलं जाणार असून ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, अशा भागातील आमदाराला नव्या विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

शेख, पाडवींचं मंत्रिपद धोक्यात

खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना वगळण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि केसी पाडवी यांना काँग्रेसकडून डच्चू दिला जाऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.

 

ताकद वाढवण्यासाठी फेरबदल ? 

काही मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री येणार आहे. राठोड आणि देशमुखांच्या जागी एक मंत्री येणार आहे. पण त्याशिवाय काँग्रेसलाही काही मूलभूत बदल करायचे आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसला हे फेरबदल करायचे आहेत, असं राजकीय विश्लेषक संजय आवटे यांनी सांगितलं. भाजप अस्थिर असल्याची चर्चा असलं तरी महाविकास आघाडीने भाजपचं हे आव्हान परतवून लावलं आहे. मंत्रिमंडळाचा फेरविस्तार होणं हाच सरकार स्थिर असल्याचा महत्त्वाचा पुरावा आहे. काँग्रेस पक्ष संघटनेच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहे. सरकार आल्यानंतर केवळ 12 मंत्र्यांनाच फायदा झाला. संघटनेला फायदा झाला नाही. त्यामुळेच संघटनेला फायदा होईल आणि केंद्र संघटन केंद्रभूत ठेवून हे फेरबदल करण्यावर काँग्रेसचा भर असेल असं आवटे यांनी स्पष्ट केलं.

You May Also Like

error: Content is protected !!