coronavirus : करोनाग्रस्तांसाठी धनाड्यांनी उघडली तिजोरी; अझीम प्रेमजी यांनी दिली एवढी रक्कम

मुंबई ः विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर 1125 कोटीची मदत करण्याचे ठरवले आहे. यापैकी विप्रो लिमिटेड 100 कोटी, विप्रो एन्टरप्रायजेस 25 कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन 1000 कोटी रुपये देऊ करणार आहे. या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणार्‍या आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असे अझीम प्रेमजी फाऊंडेशनने म्हटले आहे.

टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रूप यांनी एकत्रितपणे 1500 कोटी रुपये देऊ केले होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी 500 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तर इन्फोसिस या उद्योग समूहाने तब्बल 100 कोटीची मदत सरकारला देऊ केली आहे. तसेच महिंद्रा समूहाने कोरोनाच्या रुग्णांना लागणार्‍या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करायला सुरुवात केली होती.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.