नितीन गडकरींच्या पुढाकाराने महाराष्ट्राला दररोज मिळणार ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन

नवी दिल्ली : राज्यातील करोनाची स्थिती अतिशय गंभीर असून, हि परिस्थिती हाताबाहेर गेलीय. रुग्णांना अक्षरशः आरोग्य सुविधांचा तुटवडा सहन करवा लागतोय. यात मुख्यता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर औषधाचा तुटवडा सर्वांच्या चिंतेचा विषय ठरतो आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत विशाखापट्टणम येथून पुरवठा सुरू होईल, यामुळे विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अनेक रुग्णालयात प्राणवायूची कमतरता आहे. त्यामुळे गडकरी यांनी प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर शहरात प्राणवायूचे टँकर आणि सिलेंडर उपलब्ध होत आहेत. यापूर्वी भिलाईमधून ६० टन द्रव्य प्राणवायू असलेले टँकर मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दररोज १५७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार आहे. प्राणवायूची मागणी बघता शहरातील ५० खाटापेक्षा जास्त असलेल्या रुग्णालयांनी हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केले आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like