वीज वाहीनी अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

धुळे : वीज वाहीनी अंगावर पडल्याने येथील चाळीसगाव रोड परीसरातील महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी घडली. मृत आशा पाचकंदील परीसरातील फळविके्रेते राजेंद्र येवले यांच्या पत्नी असून घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
शहरातील चाळीसगाव रोड परीसरातील जयशंकर कॉलनीज वीज वाहीनी अंगावर पडल्याने 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे, वीज कंपनीकडे माहिती देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने महिलेचा बळी गेल्याची अनेकांची तक्रार आहे. चाळीसगाव रोडवरील जयशंकर कॉलनीत फळविक्रेते राजेंद्र येवले यांचे वास्तव्य आहे. आज सकाळी साडेऊनच्या सुमारास पत्नी आशा (वय 50) घरकामात व्यस्त होत्या. त्यावेळी घंडागाडी आल्याने कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या. घराजवळून गेलेली वीजवाहीनी तुटून आशा येवले यांच्या अंगावर पडली. विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेनंतर कुटुंबीय, परीसरातील नागरीकांमध्ये भिती पसरली. यावेळी काहींनी धाव घेत वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर आशा येवले यांना रूग्णालयात दाखल केले. आशा येवलेे यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश सुरू केला.

वीज कंपनीचे दुर्लक्ष
झाडात अडकलेल्या वीजवाहीनीचे स्पार्किंग होत असल्याने दुर्घटनेची शक्यता आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीला यापुर्वीच देण्यात आली होती. परंतु वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी माहिती मिळाल्यानंतरही दुर्लक्ष केले. वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या या गलथानपणा आजच्या घटनेने पुन्हा निदर्शनास आला असुन याबाबत कारवाई व्हावी, असा रोषही अनेकांनी व्यक्त केला.

You May Also Like

error: Content is protected !!