महिला हॉकी संघाचा दुसऱ्या सामन्यात जर्मनीकडून पराभव 

टोकियो ।  भारतीय महिला हॉकी संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जर्मनी विरुद्धच्या ग्रुप ए मधील सामन्यात टीम इंडियाला 2-0 ने पराभव पत्करावा लागला. 2016 च्या रियो ओलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या जर्मनी संघासमोर भारतीय. संघाने काही महत्त्वाच्या संधी गमावल्यामुळे पराभव पत्करावा लागला.

 

 

जगातील नंबर वन संघ असलेल्या नेदरलँडकडून पहिल्या सामन्यात  5-1 पराभव स्वीकारावा लागला.  तर दुसऱ्या सामन्यात भारत कमबॅक करणार असे वाटत असतांना दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागला.  जागतिक महिला हॉकीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा संघ जर्मनी भारताविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत होता. भारताने केलेल्या आक्रमनांना चलाखीने माघीर घालवत जर्मनी संघाने भारतीय महिलांना एकही गोल करु दिला नाही.

You May Also Like