‘आई-काकांना करोना, रेमेडिसिवरची लगेच गरज’, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनन केलं आवाहन

मुंबई  :  सध्या देशभरात करोना ची परिस्तिथी अतिशय भयावह झाली असून, या पासून गरीब श्रीमंत कोणीही वाचलेलं नाहीये. सध्या बेड्स, ऑक्सिजन, आणि रेमेदिसिवीर इंजक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

दरम्यान,  टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या उन्मुक्त चंद  याची आई आणि काकांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या आईला आणि काकांना रेमेडिसिवरची  तात्काळ गरज आहे, याबाबत कोणाला माहिती असेल तर लगेच सांगा, असं आवाहन उन्मुक्त चंद याने ट्वीट करून केलं आहे. उन्मुक्तची आई आणि काका दिल्लीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

उन्मुक्त चंद विषयी आणखी माहिती अशी कि, उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारताने 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर उन्मुक्तही विराट कोहलीप्रमाणेच भारताकडून खेळेल आणि मोठं नाव कमवेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने चांगली सुरुवात केली, पण त्याला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. यानंतर उन्मुक्त चंद काही क्रिकेट स्पर्धांमध्ये कॉमेंट्री करतानाही दिसला.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

.

You May Also Like