चिंताजनक..! करोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वाधिक तरुणांचा मृत्यू?

नवी दिल्ली : करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळं देशात तरुण वर्गाला जास्त फटका बसल्याचं दिसून येत आहे. आकडेवारीनुसार यावेळी 45 वयापेक्षा कमी असलेल्या लोकांचा सर्वाधिक मृत्यू झालाचे संशोधनातुन स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी, आयसीयू विभागामध्ये दाखल होण्याचे तरुणांचे प्रमाण वाढले आहे. ज्या राज्यांमध्ये जास्त करोना रुग्ण सापडत आहेत, तिथेच ही परिस्थिती होती, असा काही भाग नव्हता तर सर्वत्रच अशी परिस्थिती होती. जवळपास सर्वच राज्यांमध्ये 50 पेक्षा कमी वय असलेल्यांची मृतांची संख्या जास्त नोंदली गेली. तरुणांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलं आहे, असं विविध रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

यावेळी तरुण आणि वृद्ध रुग्ण संख्येचे प्रमाण जवळपास सारखेच होते. 60 ते 70 टक्के रुग्ण हे साठ वर्षांपेक्षा खालचे होते, त्यातही अर्ध्याहून अधिक 45 वयाच्या खालचे रुग्ण होते. आयसीयूमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांचा मृत्यूदर जवळपास वीस टक्के होता, असे गुडगावच्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. रेश्मा तिवारी यांनी सांगितले. तर तामिळनाडूच्या आरोग्य विभागाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार कोणतेही गंभीर आजार नसलेल्याही तरुणांचा कोरनामुळं मृत्यू झालाय.

You May Also Like