आरोग्य विभागाची उद्या लेखी परीक्षा; नाशिक विभागात 53 हजार 326 परीक्षार्थी, न्यासावर निरीक्षक ठेवणार लक्ष

नाशिक | बहुचर्चित, वादग्रस्त आणि वेगवेगळ्या घोळात अडकलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा रविवारी 31 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि काही तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
नाशिक विभागातील पाचही जिल्हयात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतके परीक्षार्थी नोंदणीकृत असून त्यांच्यासाठी पाचही जिल्हयात एकूण 129 शाळांमध्ये परीक्षेची पूर्वतयारी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली. नाशिक विभागातील एकूण 53 हजार 326 परीक्षार्थींपैकी नाशिक जिल्हयात एकूण 27 हजार 03 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 65 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच अहमदनगर जिल्हयात एकूण 8 हजार 191 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 11 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. धुळे जिल्हयात एकूण 3 हजार 14 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 06 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हयात एकूण 7 हजार 991 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 27 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हयात एकूण 7 हजार 127 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 20 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे.
सर्व परीक्षा केंद्रांवर कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आली आहे. परीक्षार्थींना कोविड नियमाचे पालन करावे. तसेच वरील सर्व 129 परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, सहाय्यक केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक यांच्या नेमणुका मे. न्यासा कंपनीमार्फत करण्यात आल्या असून ही सर्व प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी शासनाकडून मे.न्यासा कंपनीस देण्यात आलेली आहे. तरी देखील गट-ड संवर्गातील पुर्वनियोजित परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी यास्तव शासनाच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे परीक्षा केंद्र निरीक्षक म्हणून प्रत्येक केंद्रावर नियुक्त केलेले आहेत. हे निरीक्षक मे. न्यासा कंपनीच्या परीक्षा आयोजन कार्यपद्धतीवर लक्ष ठेवणार असून कोणत्याही प्रकारचा अप्रिय किंवा अपप्रकार होवू नये याकडे बारकाईने लक्ष देणार आहेत.
नाशिक जिल्हयातील परीक्षा केंद्र क्रमांक 6058 (डॉ. गुज्जर सुभाष हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देवळाली कॅम्प) हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलेले असून केंद्र क्रमांक 6071 (जनता इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,दिंडोरी ) हे नवीन परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. जुन्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींनी नवीन केंद्रावर जाण्याचे आवाहन मे. न्यासा कंपनीद्वारे करण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्या त्या जिल्हयाकरिता भरती प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. न्यासा कंपनीकडून नाशिक आरोग्य परिमंडळातील पाचही जिल्ह्यांसाठी जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हयासाठी ऋषिकेश उंडे यांची नेमणूक केली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9730138760 असा आहे. अहमदनगर जिल्हयासाठी सारिका सायगावकर यांची नेमणुक केलेली असून त्यांचा संपर्क क्रमांक 8484868543 असा आहे. धुळे जिल्हयासाठी हितेश बोरसे यांची नेमणूक केली असून त्यांचा संपर्क क्रमांक 8007803920 असा आहे. जळगाव जिल्हयासाठी सानिका पवार यांची नेमणूक केली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9503351461 असा आहे. नंदुरबार जिल्हयासाठी अशोक पाटील यांची नेमणूक केलेली असून त्यांचा संपर्क क्रमांक 7020336014 असा आहे. नाशिक मंडळाचे विभागीय व्यवस्थापक या पदावर महेश पाटील यांची मे. न्यासा कंपनीने नेमणूक केलेली असून त्यांचा संपर्क क्रमांक 9673069484 असा आहे. परीक्षार्थींना काहीही अडचण आल्यास त्यांनी वरील आपल्या जिल्हयातील जिल्हा समन्वयक किंवा झोनल मॅनजर यांचेशी उपरोक्त दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनही आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी केले आहे.

You May Also Like