“होय, संघर्ष करणार”; संजय राऊत

मुंबई शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून सूचक विधान केले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेची संवाद साधला आहे. शिवसेना आणि हिंदुत्व कदापी वेगळं होऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले असून, मी याक्षणी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी “होय, संघर्ष करणार” असे आशयाचे ट्विट केले आहे.

संजय राऊतांचे हे ट्वीट सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत असून राजकीय घडामोडीत चर्चांना उधाण आले आहे. यानंतर उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची कारवाही करतात का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like