योगी सरकारचा निर्णय ;१८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण

देशात  सध्या करोनाने थैमान घातला आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या सर्व परिस्थीतीचा विचार करता केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास  परवानगी आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या विलगीकरणात आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना करोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा पराभव होईल आणि भारत जिंकेल”.

योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा तसंच वयोगटाप्रमाणे डेटा तयार करण्याचा आदेश दिला आहे.

उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like