आपल्याकडे एक डोससाठी हालहाल; अन् युरोपियन कमिशनकडून 100 कोटींपेक्षा जास्तीच बुकींग

नवी दिल्ली : सध्या करोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याला सामोरा जात आहे. भारतातील लस उत्पादक कंपन्यांसमोर उत्पादन वाढीचं आव्हान उभं राहिलंय. एकीकडे भारतात हे चित्र असताना दुसरीकडे युरोपमध्ये युरोपियन कमिशनने जगातील दोन प्रमुख लस उत्पादक कंपन्यांसोबत करार केला आहे. या कराराद्वरे युरोपियन कमिशनच्या सदस्य देशांसाठी एक अब्ज 80 कोटी डोसचं बुकिंग करण्यात आलं आहे. युरोपियन कमिशननं हा करार बायोएनटेक आणि फायझर यां कंपन्यांसोबत केला आहे.

युरोपियन कमिशन आणि बायोएनटेक आणि फायझर या कंपन्यांमध्ये कोरोना लसीचं उत्पादन कुठे करायचं या विषयी देखील करारामध्ये ठळकपणे नमूद करण्यात आलं आहे. करारानुसार दोन्ही कंपन्यांना कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन युरोपियन यूनियनच्या सदस्य देशांमध्ये करावं लागणार आहे. त्याशिवाय महत्वाची बाब म्हणजे युरोपियन यूनियनमधील सदस्य देशांमधूनच कच्च्या मालाची आयात करावी, अशी अट देखील या करारामध्ये घालण्यात आली आहे.

युरोपियन यूनियनच्या सदस्य देशांसाठी कोरोना लसींच्या 1 अब्ज 80 कोटी डोसंचं बुकिंग केल्याची माहिती आहे. या करारानुसार बायोएनटेक आणि फायझर या दोन्ही कंपन्या युरोपियन यूनियनमधील सदस्य देशांना कोरोना लसींचा पुरवठा करतील. हा पुरवठा दोन्ही कंपन्यांना 2021 ते 2023 दरम्यान करायचा आहे.

युरोप खंडातील 27 देशांचा सहभाग
युरोपियन यूनियनमध्ये युरोप खंडातील 27 देशांचा सहभाग आहे. या सर्व देशांची एकत्रित लोकसंख्या 447 दशलक्ष इतकी आहे. युरोपियन यूनियनमधून काही वर्षांपूर्वीचं ब्रिटन बाहेर पडला होता. युरोपियन यूनियनमधील सदस्य देशांनी त्यांची एक बाजारपेठ तयार केलेली आहे. त्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. युरोपियन यूनियनमध्ये फिनलँड, स्वीडन, आयर्लंड, डेन्मार्क, इस्टोरिया, पोलंड, नेदरलँड, जर्मनी, झेक रिपब्लिक, बेल्जियम, ऑस्ट्रिया, रोमानिया, बल्गेरिया, ग्रीस, सायप्रस, माल्टा, इटली, हंगेरी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, अशा एकूण 27 देशांचा समावेश आहे.

You May Also Like