सिडकोतील सोनाली मटन भाकरी येथे तरुणाचा खून

नाशिक प्रतिनिधी : जुन्या सिडकोतील स्टेट बँके जवळ  असलेल्या हॉटेल सोनाली मटन भाकरी येथे देवळाली गावातील राजवाडा येथे राहणाऱ्या प्रसाद भालेराव (२५) याचा काल रात्री (दि. २8 जुलैै) जेवनाच्या वादावरून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

गंभीर अशा जखमी अवस्थेतील प्रसाद भालेराव यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत माहिती अशी की, हॉटेल सोनाली मटन भाकरी या हॉटेलमध्ये शेजारच्या टेबलावर बसलेल्या युवकांनी प्रसाद भालेराव या युवकाशी वाद झाल्याने हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. फक्त पार्सल सेवा चालू असताना बसून हे युवक जेवण करीत होते. दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालयाचे इन्स्पेक्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक नाशिक दौऱ्यावर असताना ही दुर्देवी घटना घडल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे बेकायदेशीर हॉटेल उशिरापर्यंत सुरू असतात अशी माहिती आहे. पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी फोगावली असून उघडपणे मद्यविक्रीही सुरू असते असा नागरिकांनी आरोप केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅ ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like