सॅनी टायझर पिऊन युवतीची आत्महत्या

नाशिक : बिटको रुग्णालयाच्या आवारात सॅनिटायझर पिऊन दोन्ही हाताच्या मनगटावर धारधार शस्त्राने वार केल्याने दिंडोरी तालुक्यातील युवती जखमी झाली. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथील युवती शिवानी लक्ष्मण भुजबळ (20) हिने रविवारी सकाळी सातच्या सुमारास बिटको रुग्णालयाच्या आवारात अर्धा लिटर सॅनिटायझर प्राशन केले. नंतर दोन्ही हाताच्या मनगटांवर धारधार शस्त्राने वार केले. ती जखमी झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!